दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या उपसंपादिका योगिता साळवी यांना ‘मूकनायक सामाजिक पत्रकारिता’पुरस्कार

31 Jan 2019 23:19:23

 

 
 
 
 
नवी दिल्ली : महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभाग व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी नवी दिल्ली येथे ‘मूकनायक सामाजिक पत्रकारिता’ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या उपसंपादिका योगिता साळवी यांना हा पुरस्कार केंद्रीय मंत्री थावरचंद गहलोत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
Powered By Sangraha 9.0