रुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

30 Jan 2019 10:38:02

 

 
 
 
मुंबई : परळ आणि दादर दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक बुधवारी सकाळी विस्कळीत झाली. ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे धीम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावर वळविण्यात आली आहे.
 
ऐन सकाळच्या वेळी रेल्वे रुळाला तडा गेल्यामुळे नोकरीला जाणाऱ्या प्रवाशांना मात्र हाल सोसावे लागत आहेत. मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लोकल गाड्यादेखील उशिरा येण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यातही कुर्ला- सायन दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
Powered By Sangraha 9.0