रनाळेत कूपनलिकेद्वारे विहिरीत पाणीसाठा

25 Jan 2019 12:00:09

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ग्रामपंचायतीची उपाययोजना

 
 
 
नंदुरबार : 
 
तालुक्यातील रनाळे ग्रामपंचायतीतर्फे संभाव्य पाणीटंचाईववर मात करण्यासाठी कूपनलिकेद्वारे विहिरीत पाणी सोडून गावकर्‍यांची पाणीटंचाई दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
 
 
शिवसेनेचे माजी जिल्हा सहसंपर्क प्रमुख दीपक गवते यांच्या मार्गदर्शनाखाली व लोकनियुक्त सरपंचा तृष्णा गवते यांच्या प्रयत्नाने तात्पुरती नळ पाणीपुरवठा योजनेंतर्गत रनाळे ग्रामपंचायतीतर्फे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून रनाळे गावाच्या संभाव पाणी टंचाईवर मात करण्यासाठी कूपनलिका करून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या विहिरीत पाईपलाईनद्वारे विहिरीत पाणी सोडवून पाणी साठविण्यात येणार आहे.
 
 
हिंदू हृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करण्यात आले. यानंतर दीपक गवते यांच्या हस्ते जलपूजन करुन विहिरीत पाणी सोडण्यात आले.
 
 
कार्यक्रमास सरपंचा तृष्णा दीपक गवते, ग्रामसेवक बी. ए. पाटील, सुरेश भाऊसाहेब, गोकुळ नागरे, पंडित नागरे, संतोष पाटील, बळीराम नागरे, अशोक काकडे, बापू गवते, विशाल कळकट, बबलू नागरे, रवींद्र तांबोळी, राजू पठाण, दीपक पाटील, निंब धात्रक, पिंटू तांबोळी, योगेश सानप, गणेश शिंत्रे, संजय भाबळ, संजय चकोर, बबलू चकोर, योगेश गाभने, रमेश तांबोळी, अमीर पठाण, सलीम मिर्झा, राहुल नागरे, चंदू कळकट, राजू चौधरी, विलास ओगले, राकेश सानप, पंकज नागरे, अमित गवते, अशोक काकडे आदी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0