चेतक महोत्सवात आता सेलिब्रिटींची हजेरी

02 Jan 2019 16:31:26
 
 

नंदुरबार : पाचशे वर्षांपेक्षा अधिक काळाची परंपरा असणारा नंदुरबारच्या सारंगखेड्य़ातील वैशिष्टय़पूर्ण घोडेबाजार चेतक फेस्टिव्हलची भूरळ आता बॉलीवुडलाही पडली आहे. येत्या काळात अनेक कलाकार चेतक फेस्टिव्हलला भेट देणार आहेत.

 

जानेवारी रोजी हिंदी चित्रपटसृष्टीतील चार मोठे कलाकार उपस्थित राहणार आहेत, असल्याची माहिती आयोजन समितीने दिली. बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता रणदीप हुड्डा, शेखर सुमन, अर्चना पुरणसिंग, पर्मित शेट्टी आणि अली फजल हे अभिनेते सकाळी १० वाजता चेतक फेस्टिव्हलला भेट देणार आहेत.

 

हे चारही कलाकार या ठिकाणी येणार असून ते घोडे बाजाराची रपेट करणार आहेत. आगामी चित्रपटासाठी घोड्यांची निवड करण्यासाठी ते येणार असल्याचे म्हटले जात आहे. हे चारही कलाकार या फेस्टिव्हलला उपस्थित राहणार असल्याने येथे भेट देणाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

 


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
Powered By Sangraha 9.0