मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना आता अधिकच सोप्पी

16 Jan 2019 14:28:06



महावितरणच्या नवीन स्वतंत्र पोर्टलचा ऊर्जामंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ


मुंबई : मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेचा राज्यातील शेतकऱ्यांना लाभ घ्याता यावा यासाठी महावितरणने महत्वाचे पाऊल उचलले आहे. महावितरणच्या www.mahadiscom.in या वेबसाईटवर शेतकऱ्यांना एक स्वत्रंत्र पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले असून यामुळे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेणे अधिक सोप्पे होणार आहे. या पोर्टलचा शुभारंभ ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आला. मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेच्या स्वत्रंत्र पोर्टलच्या शुभारंभ प्रसंगी बावनकुळे म्हणाले, शेतकऱ्यांना सौर कृषी पंपासाठी अर्ज करणे सोयीचे व्हावे व वीजजोडणीच्या प्रक्रियेत पारदर्शकता असावी, या उद्देशाने महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर स्वतंत्र पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले आहे.

 

या स्वतंत्र पोर्टलमुळे काय फायदा होणार?

 

या पोर्टलद्वारे शेतकऱ्यांना सौर कृषिपंपासाठी अर्ज करणे, अर्जासोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेची संपूर्ण माहिती, ऑनलाईनद्वारे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सौर कृषी पंपाची क्षमता ठरविणे, अर्जाची सद्यस्थिती बघणे अशा सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यासोबतच या योजनेमध्ये सौर कृषी पंपासाठी कंत्राटदार निवडण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली असून शेतकरी या पोर्टलद्वारे कंत्राटदाराची निवड करून त्या कंत्राटदाराकडून सौर कृषिपंप बसवून घेऊ शकतात.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0