निर्माते सदानंद लाड यांची आत्महत्या

16 Jan 2019 16:09:33

 

 
 
 
मुंबई : सिनेमा निर्माते सदानंद लाड उर्फ पप्पू लाड यांनी बुधवारी सकाळी लाडाचा गणपती मंदिरात आत्महत्या केली. बुधवारी सकाळी मंदिर उघडल्यावर ही घटना समोर आली. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
 

राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ यांच्याशी सदानंद लाड यांचे जवळचे संबंध होते. लाडाचा गणपती या मंदिराची निर्मिती सदानंद लाड यांनीच केली होती. लाडाचा गणपती हे मंदिर निर्माण केल्यानंतर सदानंद लाड हे प्रसिद्धीच्या झोतात आले होते. सदानंद लाड यांनी १५ पेक्षा अधिक मराठी सिनेमांची निर्मिती केली आहे.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
Powered By Sangraha 9.0