मकरसंक्रांतीला विघ्न

15 Jan 2019 17:31:58

नर्मदा नदीत बोट उलटली, पाच ठार, 39 अत्यवस्थ

 
 
नंदूरबार:
जिल्ह्यातील धाडगाव तालुक्यातील भुशा पॉइंटजवळ 50 हून अधिक प्रवाशांना घेऊन जाणारी बोट नर्मदा नदीत उलटली आहे. या दुर्घटनेत 5 ठार झाले असून 39 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळते आहे.
 
 
भुशा पॉइंट जवळ ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी रवाना झाले. पण घटनास्थळ दुर्गम असल्यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत.आतापर्यंत चार जणांना सुखरूप नदीतून बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे. जखमींना धाडगाव तालुका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी 39 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. अजूनही काही प्रवासी बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे.
 
 
अत्यावस्थ नागरिकांना तातडीने धडगाव तालुक्यातील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व लोक तेलखेडी येथील असल्याचे समजते. मकर संक्रांती निमित्त भाविक नर्मदा नदीची पूजा करण्यासाठी गेले होते, अशी माहिती मिळाली आहे. घटनास्थळी तीन तरंग रूग्णावहिका व आठ 108 पोहोचल्या आहेत.
Powered By Sangraha 9.0