सार्वजनिक गाड्यांमध्ये 'या' गोष्टी असणे अनिवार्य

10 Jan 2019 18:33:55



मुंबई : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेऊन काही निर्णय घेतले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेत नक्कीच वाढ होणार आहे. आता सार्वजनिक गाड्यांमध्ये ट्रेसिंग डिव्हाईस आणि पॅनिक बटण असणे अनिवार्य करण्यात आले आहे.

 

सार्वजनिक प्रवास गाड्यांमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी नवीन उपाय योजना करण्यात आली आहे. तसेच रिक्षा आणि ई-रिक्षासाठी हा नियम लागू करण्यात आलेला नाही. परंतु १ जानेवारी नंतर रजिस्ट्रेशन झालेल्या वाहनांसाठी हा नियम लागू करण्यात आला आहे. या वित्तीय वर्षाच्या सुरुवातीला नवीन नियमावली नुसार एआयएस १४० मध्ये प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यामुळे सार्वजिक प्रवास गाड्यांमध्ये ट्रेसिंग डिवाइस आणि पॅनिक बटण असणे आवश्यक आहे.

 

एआयएस १४० खासरकरुन महिलांच्या सुरक्षिततेसाठी बनविण्यात आला आहे. तसेच विद्यार्थी आणि इतर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ही या यंत्रणेचा उपयोग होणार आहे. त्याचसोबत औषधोपचार सेवा ही पुरविण्यात येणार आहे. गाडीमधील ही यंत्रणा जागेचे ठिकाण ट्रेस करु शकणार असल्याने वाहतुक संबंधित सर्व माहिती उपलब्ध होणार आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0