मुंबई-पुणे महामार्ग गुरुवारी २ तास बंद

05 Sep 2018 14:23:15

 
 
पुणे: उद्या म्हणजे गुरुवारी दिनांक ६ सप्टेंबर रोजी मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक काही तासांसाठी बंद राहील. दुपारी १२ ते २ पर्यंत हा बंद असेल, अशी माहिती राज्य महामार्ग वाहतूक पोलीस मंडळाचे अधीक्षक विजय पाटील यांनी दिली. मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहने ही जुन्या मुंबई-पुणे महामार्गाकडे वळवण्यात येतील, असे ही त्यांनी नमूद केले.
 
 
हा बंद फक्त गुरुवारीच घेण्यात येणार असल्याची माहिती एमएसआरडीसीने दिली आहे. दरम्यान पुण्याकडून मुंबईकडे येणाऱ्या मार्गिकेवर कोणताही ब्लॉक नसेल असेही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहतुकीवर याचा कोणताही परिणाम होणार नाही. ऐन गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून काही सूचनाफलक लावण्यात येणार आहेत. तसेच महामार्गावर ओव्हरहेड स्ट्रक्चर (गॅन्ट्री) उभारत असल्यामुळे हा बंद ठेवण्यात येत आहे.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0