छोट्या गुंतवणूकदारांसाठी खुशखबर : बचत व्याजदरांत वाढ

20 Sep 2018 13:59:55

 

 
नवी दिल्ली : केंद्र सरकारने छोट्या गुंतवणूकदारांच्या फायद्याचा निर्णय घेतला आहे. तिसऱ्या तिमाहीतील म्हणजेत १ आक्टोबर ते ३१ डिसेंबरपर्यंत छोट्या बचत योजनांवरील व्याजदरात मोठी वाढ केली आहे. १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर या तिमाहीसाठी नवे व्याजदर लागू असतील. यात सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ), सुकन्या समृद्धी योजना, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (एनएससी), किसान विकास पत्र योजना आणि पोस्टाच्या विविध सेवांवरील मुदत ठेवींवर ०.३ ते ०.४ टक्के वाढ केली आहे. गेल्या दोन तिमाहीमध्ये व्याजदरांत कोणताही बदल झालेला नव्हता. अर्थ मंत्रालयाने याबाबत परीपत्रक जाहिर करत ही माहिती दिली आहे. त्यानुसार सुकन्या समृद्धी योजनेतील बचतीवर ८.५ टक्के तर, ज्येष्ठ नागरिकांकडून केल्या जाणाऱ्या बचतीवर ८.७ टक्के व्याज मिळणार आहे. पीपीएफ व एनएससीवर ८ टक्के व्याज मिळेल. या योजनेचा फायदा सुकन्या समृद्धी, किसान विकास पत्र, पीपीएफ, एनएसई, ज्येष्ठ नागरीक बचत योजना, एक ते पाच वर्षांपर्यंतच्या बचत योजनांना याचा फायदा होणार आहे.
 
 

योजना नवे व्याजदर

· बचत खाते ४ टक्के

· वार्षिक बचत ६.९ टक्के (तिमाही)

· द्विवार्षिक बचत ७ टक्के (तिमाही)

· त्रैवार्षिक बचत ७ टक्के (तिमाही)

· पाच वर्षे बचत ७.८ टक्के (तिमाही व रोख)

· पाच वर्षे आवर्ती ठेव योजना ७.७ टक्के (तिमाही व रोख)

· पंचवार्षिक राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र ८.७ टक्के (तिमाही व रोख)

· पीपीएफ ८ टक्के (वार्षिक)

· किसान विकास पत्र ८ टक्के (वार्षिक)

· सुकन्या समृद्धी विकास योजना (८.५ टक्के)

(माहिती स्त्रोत – केंद्रीय अर्थमंत्रालयाचे संकेतस्थळ)

 

 
               माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/
 
 
 
Powered By Sangraha 9.0