करुणानिधींची प्रकृती खालावली

07 Aug 2018 11:47:27

रुग्णालयाबाहेर समर्थकांची गर्दी



चेन्नई : गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत असलेले डीएमके पक्षाचे अध्यक्ष एम. करुणानिधी यांची प्रकृती आज सकाळी अधिक खालावली आहे. करुणानिधी यांना दाखल करण्यात आलेल्या चेन्नईमधील कावेरी रुग्णालयाने ही माहिती दिली असून हे वृत्त कळल्यानंतर करुणानिधी यांच्या समर्थकांनी रूग्णालयाबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. त्यामुळे रूग्णालयाबाहेरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.


आज सकाळी कावेरी रुग्णालयाने जारी केलेल्या बुलेटीनमधून ही माहितीसमोर आली आहे. काल रात्रीपासून करुणानिधी यांच्या प्रकृती खालवत निघाल्याचे रुग्णालयाने म्हटले आहे. त्यामुळे करुणानिधी यांचे कुटुंबीय आणि निकटवर्ती मंडळी रुग्णालयात येऊ लागले आहे. तसेच ही माहिती बाहेर पसरल्यानंतर करुणानिधी यांचे समर्थक देखील राज्यभरातून याठिकाणी गर्दी करू लागले आहेत. त्यामुळे सध्या रुग्णालयाबाहेरील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. दरम्यान डीएमकेच्या नेत्या कनिमौझी यांनी या नागरिकांची भेट घेतली असून सर्वाना शांततेचे आवाहन त्यांनी केले आहे.
Powered By Sangraha 9.0