फेरीवाल्यांचे साम्राज्य

23 Aug 2018 18:02:48


 

१५० मीटरचा नियम लागू केला, या नियमांतर्गत स्थानक परिसराच्या १५० मीटरच्या रस्त्यांवर फेरीवाल्यांना बंदी घालण्यात आली. नव्याचे नऊ दिवस, तसा हा नियम काही दिवस पाळला गेला पण मनमानी नाही करणार तर ते फेरीवाले कसले?

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

डोबिवलीत आधी रस्त्यावरचे खड्डे, मग शहरातील वाढती वाहतूककोंडी, रिक्षाचालकांची मनमानी हे सगळं सुरू असतानाच आता त्यात भर पडलीय ती फेरीवाल्यांची. म्हणजे तसा या फेरीवाल्यांचा सगळ्या रस्त्यांवर पहिला हक्कच. म्हणून तर ते रस्ता अडवून बसलेले असतात. मग काय तर १५० मीटरचा नियम लागू केला, या नियमांतर्गत स्थानक परिसराच्या १५० मीटरच्या रस्त्यांवर फेरीवाल्यांना बंदी घालण्यात आली. नव्याचे नऊ दिवस, तसा हा नियम काही दिवस पाळला गेला पण मनमानी नाही करणार तर ते फेरीवाले कसले? डोंबिवली स्थानकाजवळचे सगळे पूल हे पादचार्यांसाठी नसून ते फेरीवाल्यांचेच झाले आहेत की, काय असा भास होतो. सगळ्या पुलांवर संध्याकाळ झाली नाही की फेरीवाले आपलं बस्तान मांडून बसलेले असतात. आता पादचार्यांनी रस्यावरून चालायचं की फेरीवाल्यांच्या गर्दीतून? आधीच वाढती लोकसंख्या, त्यात रेल्वेस्थानक परिसरातले लहान रस्ते, या सगळ्यांमुळे नागरिकांची नाचक्की झाली आहे. या फेरीवाल्यांवर पालिकेने फेरीवाला हटाव वगैरे मोहीम सुरू करून कारवाई केली खरी, पण त्यांची पाठ फिरली की परिस्थितीजैसे थे.’ पालिकेच्या गाड्या आल्या की, सामान घेऊन पळायचं किंवा सामान लपवून ठेवायचं, गाडी त्या रस्त्यावरून पुढे गेली की लगेच दुकानं मांडायला सुरुवात. एकीकडे नागरिकांना चालायला रस्ता नाही दुसरीकडे या फेरीवाल्यांना अधिकृत जागाही नाही. ‘आता जागा देऊ, नंतर देऊ,’ असं म्हणत पालिकेची चालढकल कायम चालूच असते, पण याचा नाहक त्रास होतो तो सामान्य नागरिकांना. रेल्वेस्थानक परिसरात फेरीवाल्यांना बंदी घातली असली तरी, हे फेरीवाले आपली दुकानं घेऊन रात्रीच्यावेळी पुलांवर असतातच, यामुळे रेल्वेस्थानकाजवळचा परिसर सुरक्षितही राहिला नाही. रात्रीच्यावेळी या फेरीवाल्यांच्या गर्दीत सहज चोर्याही सुरू झाल्या आहेतपण, पालिकाही या फेरीवाल्यांवर कारवाई करताना दुटप्पीपणाने वागते, म्हणजे त्यांच्याकडून सामानही जप्त करायचं आणि दंडही घ्यायचा. यामुळे हे फेरीवालेही आक्रमक झाले तर यात नवल असं काही नाही. एकतर या फेरीवाल्यांना त्यांची अशी जागा द्या किंवा निदान पादचार्यांना चालण्यायोग्य रस्ता, एवढीच काय ती मागणी नागरिक करतायत पण पालिका आणि फेरीवाल्यांच्या भांडणात भरडला जातोय तो डोंबिवलीकर...

 

ऐतिहासिक पुलाची निवृत्ती

 

तसं म्हणायला गेलं तर आपल्या इतिहासात कल्याण शहराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. एक ऐतिहासिक शहर म्हणून या शहराला ओळखले जाते. मग त्यात दुर्गाडी किल्ला असो किंवा शिवाजी चौक. त्याचबरोबर इथला १०४ वर्षांपासून असलेला पत्रीपूल. ब्रिटिश काळात बांधलेल्या या पुलाने जवळजवळ १०० वर्ष लोकांची सेवा केली आणि अखेर हा पूल आता निवृत्त होतोय.  महिनाभरापूर्वी रेल्वे, पालिका आणि आयआयटीकडून एक सर्वेक्षण करण्यात आले. त्यात मुंबईतील इतर पुलांबरोबरच कल्याणचा हा ऐतिहासिक पूलही धोकदायक पुलांच्या यादीत आला आणि त्याच्या निवृत्तीची तारीख फक्त ठरवायची बाकी राहिली. एवढी वर्षं शहरातील पूर्व आणि पश्चिम परिसराला जोडणारा हा पूल आता पाडण्यात येणार आहे. आधी हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आणि आता हा पूल २४ ऑगस्टला इतिहासजमा होणार आहे.

 

एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर रेल्वेला मुंबईतील पुलांचे सर्वेेक्षण करण्याची बुद्धी झाली खरी, पण एवढे वर्ष जीर्ण झालेला हा पूल पाडण्यास २०१८ साल उजाडावं लागलं. आपल्या वयाची शंभरी ओलांडल्यानंतर या पुलाचे मूल्यमापन करण्यात आले आणि त्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला, पण हा पूल चालण्यायोग्यही नाही, असं सर्वेक्षणात आल्यानंतर अखेर या पुलाला निवृत्तीच देण्यात आली. लाखो वाहनांची या पुलावरून दररोजची ये-जा असायची. १९१४ साली हा पूल बांधण्यात आला. मात्र, नंतर हा पूल रेल्वेअंतर्गत असल्याने या पुलाची सर्व जबाबदारी रेल्वेकडेच होती, मात्र रेल्वेच्या दिरंगाईमुळे गेली १५ वर्षं हा पूल धोकादायक असल्यासारखाच होता. या पुलाची लांबीही तेवढी नसल्यामुळे शहरातील वाहतूककोंडीतही वाढ झाली होती. त्यामुळे हा पूल पाडून तीन महिन्यांत रेल्वेकडून याच ठिकाणी नवीन पूल बांधण्यात येणार आहे. ही ऐतिहासिक वास्तू पूलतज्ज्ञांच्या निगराणीखाली तोडण्याची विनंती रेल्वे प्रशासनाला करण्यात आल्यामुळे हा पूल योग्य पद्धतीनेच तोडण्यात येणार आहे. मात्र, येणारे तीन महिने हे वाहतूककोंडीचे असतील, असं नागरिकांनी गृहीत धरायला हरकत नाही. पण, असे असले तरी कल्याणच्या इतिहासातील एक वास्तू कमी झाल्याचं दु: मात्रनक्कीच आहे.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
Powered By Sangraha 9.0