एक वेळ समझोता याेजनेस ३० सप्टेंबरपर्यंत मुदत वाढ

02 Jul 2018 14:46:23
 
 
 
 
 
 
भंडारा :  छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७  या योजनेंतर्गत ३० जून २०१८ रोजीचे शासन निर्णयान्वये मुद्दल व व्याजासह १.५ लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यासाठी एकवेळ समझोता योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या हिस्स्यांची संपूर्ण रक्कम भरण्याचा कालावधी ३० जून रोजी संपुष्टात आल्याने सदर योजनेंतर्गत मुद्दल व व्याजासह १.५० लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी एकवेळ समझोता योजनेखाली पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या हिस्स्याची संपूर्ण रक्कम भरण्याचा कालावधी १  जूलै ते ३० सप्टेंबर रोजीपर्यंत वाढविण्यात आलेला आहे. संबंधित शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था भंडारा यांनी केले आहे.
 
 
तसेच छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७  यायोजनेंतर्गत कर्जमाफी व एकवेळ समझोता योजना या योजनेंतर्गत लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांनी सन २०१८-१९ यावर्षीचे खरीप पीककर्ज घेण्यासाठी संबंधित बँकेशी व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेशी संपर्क साधून पीककर्ज प्राप्त करुन घ्यावे व याबाबत काही अडचणी असल्यास संबंधित तालुका सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहाकारी संस्था, भंडारा यांनी केले आहे. 
 
 
 
Powered By Sangraha 9.0