वनहक्क पट्टयांची प्रकरणे तातडीने निकाली काढा : बडोले

27 Jun 2018 15:22:10

 
 
गोंदिया : मागील काही वर्षापासून वनहक्क जमिनीच्या पट्टयांची प्रकरणे प्रलंबीत आहे. संबंधित लाभार्थ्यांना या वनहक्क पट्टयांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रलंबीत प्रकरणे तातडीने निकाली काढा असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले. २५ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात वनहक्क पट्टे प्रकरणांचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी आमदार संजय पुराम, जि.प.उपाध्यक्ष अलताफ हमीद, जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे, निवासी उपजिल्हाधिकारी हरीश धार्मिक यांची प्रमुख्याने उपस्थिती होती.
 
 
बडोले यावेळी म्हणाले, लोकांजवळ शेती नाही. त्यामुळे वनहक्क पट्टयांची जूने दावे निकाली काढण्यासाठी उपविभागीय स्तरावर शिबिरे घेवून प्रलंबीत प्रकरणे लवकराव लवकर निकाली काढण्यात यावीत. उपविभागीय स्तरावर १७६३४ प्राप्त दावे असून अर्जुनी/मोरगाव - ४३९२, तिरोडा - ३०२, देवरी - ३८० व गोंदिया असे एकूण ५०७४ दावे प्रलंबित आहेत. अनेक वर्षापासून लाभार्थी वनहक्क पट्टयांच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे वनहक्क पट्टयांची प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी प्रशासनाने वैयक्तीक लक्ष्य दयावे असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
Powered By Sangraha 9.0