अजित डोवल अमित शाह यांच्या भेटीला

19 Jun 2018 11:40:55

काश्मीर मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता 

 


नवी दिल्ली :
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल हे आज भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवास्थानी पोहोचले आहे. काश्मीरमध्ये सध्या सुरू असलेल्या भाजप-पीडीपीमधला राजकीय वाद आणि काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्था याविषयी या बैठकीमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे.

अमित शाह यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी ही भेट होणार आहे. भारत सरकारने जम्मू-काश्मीरमधील शस्त्रसंधी मागे घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यातील पीडीपी आणि भाजप सरकारमध्ये खटके उडण्यास सुरुवात झाली आहे. पीडीपीच्या मते सरकारने फुटीरतावाद्यांशी चर्चा करून काश्मीर समस्येवर तोडगा काढावा. परंतु सरकारने याला नकार दिल्यामुळे सध्या दोन्ही पक्षांमध्ये मतभेद सुरु झाले आहेत. त्यामुळे काश्मीर समस्येवर नेमका काय उपाय करावा ? यासाठी म्हणून शाह यांनी डोवल यांना बैठकीसाठी बोलावले आहे. याचबरोबर जम्मू काश्मीर सरकारमधील भाजप नेत्यांची देखील शाह यांनी आज एक बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये देखील शाह हे काश्मीरमध्ये सुरु असलेल्या समस्येवर चर्चा करणार आहेत.
Powered By Sangraha 9.0