जिल्ह्यासाठी ९८४.४५ क्विंटल साखरेचे नियतन मंजूर

25 May 2018 15:47:21
 
 
 
 
हिंगोली : सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेअंतर्गत हिंगोली जिल्‍हयातील अंत्‍योदय शिधापत्रिकाधारकांसाठी शासनाने जून, जुलै आणि ऑगस्ट २०१८  या तीन महिन्यांसाठी नियमित नियतन साखर प्रति शिधापत्रिका एक किलो याप्रमाणे मंजूर केले आहे. या महिन्‍यात जिल्‍ह्यासाठी ९८४.४५ क्विंटलचे नियतन शासनाकडून प्राप्‍त झाले आहे. या नियतनाची उचल करुन प्रत्‍यक्ष शिधापत्रिकाधारकांस संबंधीत स्‍वस्‍त धान्‍य दुकानामार्फत वितरण करण्‍यात येणार आहे. 
 
 
 
तालुका निहाय नियतन पुढील प्रमाणे देण्‍यात आले आहे. हिंगोली- २६१.४५ , औंढा ना.- १२९, सेनगाव- २०७, कळमनुरी-२०७ , वसमत- १८० , याची सर्व अंत्‍योदय शिधापत्रिकाधारकांनी स्‍वस्‍त धान्‍य दुकानातून साखरेची उचल करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी ,हिंगोली यांनी केले आहे. 
 
 
 
Powered By Sangraha 9.0