आजपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाच्या दौऱ्यावर

21 May 2018 10:54:43
 
 
 
 
 
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून रशियाच्या दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्यात ते रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांची भेट घेणार आहेत. नरेंद्र मोदी आणि व्लादिमीर पुतिन यांची अनौपचारिक भेट होणार असून यावेळी ते विविध विषयांवर चर्चा करणार आहेत. सुरक्षा, सांस्कृतिक, व्यापार अशा विविध विषयांवरील हे दोन्ही नेते एकमेकांसोबत चर्चा करणार आहेत.
 
 
 
 
रशियातील सोची शहरात नरेंद्र मोदी प्रथम उतरणार असून या शहरापासून त्यांचा रशिया दौरा सुरु होणार आहे. या भेटीत ब्रिक्स, एससीओ या विषयावर देखील दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होवू शकते असे म्हटले जात आहे. भारत आणि रशिया या दोन्ही देशांचे संबंध पहिल्यापासून चांगले राहिले आहेत. हे संबंध अजून मजबूत करण्यासाठी नरेंद्र मोदी यांचा हा दौरा महत्वाचा ठरणार आहे.
 
 
रशिया नेहमी भारताला सुरक्षा क्षेत्रात, व्यापार क्षेत्रात मदत करत आला आहे आता हे संबंध अजून पुढे जावे तसेच जागतिकदृष्टीने हे संबंध अजून घट्ट व्हावे यासाठी नरेंद्र मोदी यांचा हा दौरा महत्वाचा ठरणार आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये यावेळी चाबहार बंदर आणि इराण अणुशक्ती विषयावर चर्चा करण्यात येणार आहे. नरेंद्र मोदी यांचा हा दौरा ऐतिहासिक दौरा ठरणार आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0