दादासाहेब फाळके यांची गुगलने केली आठवण

30 Apr 2018 10:55:06
 
 
 
 
 
 
 
भारतीय चित्रपटाचे जनक म्हणून ओळखले जाणारे दादासाहेब फाळके यांचा आज १४८ वा वाढदिवस असल्याने गुगलने त्यांना डूडलच्या माध्यमातून स्मरणात आणले आहे. धुंडिराज गोविंद फाळके ऊर्फ दादासाहेब फाळके हे चित्रपटनिर्मिती करणारे महाराष्ट्रातील व भारतातील पहिले चित्रपटनिर्माते होते आणि यासाठीच त्यांना भारतीय चित्रपटांचा जनक मानले जाते.
 
 
 
 
१९१३ साली त्यांनी निर्मित केलेला राजा हरिश्चंद्र हा चित्रपट मराठी व भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील आद्य चित्रपट ठरला. १९३७ पर्यंतच्या आपल्या १९ वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी ९५ चित्रपट व २६ लघुपटांची निर्मिती केली. त्यांच्या चित्रपटविषयक योगदानाबद्दल भारतीय चित्रसृष्टीतील सर्वांत मोठा पुरस्कार त्यांच्या नावाने दिला जातो. दादासाहेब फाळक्यांचा जन्म नाशकाहून तीस किलोमीटर अंतरावरच्या त्र्यंबकेश्वर येथे झाला. त्यांचे वडील प्रसिद्ध संस्कृतज्ञ होते. 
 
 
हे त्यांचे प्रसिद्ध चित्रपट : 
 
 
राजा हरिश्चंद्र (इ.स. १९१३)
मोहिनी भस्मासूर (इ.स. १९१३)
सावित्री सत्यवान (इ.स. १९१४)
श्रीकृष्णजन्म (इ.स. १९१८)
कालिया मर्दन (इ.स. १९१९)
सेतुबंधन (इ.स. १९३२)
गंगावतरण (इ.स. १९३७)
 
 
 
Powered By Sangraha 9.0