खोट्या बातम्या देत नाहीत तर घाबरता कशाला ?

03 Apr 2018 10:34:59

पत्रकार मार्गदर्शक सूचनांवरून सोशल मिडीयावर नवा वाद


प्रसार माध्यमांमध्ये उठणाऱ्या खोट्या बातम्यांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने जारी केलेल्या नव्या मार्गदर्शक सूचनांवरून सध्या सोशल मिडीयावर एक नवा वाद सुरु झाला आहे. केंद्र सरकारने पत्रकारांसाठी तयार केलेला हा कायदा म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी असल्याचा आरोप काही जणांकडून सोशल मिडीयावर केला जात आहे. तर सरकारच्या या निर्णयाला पाठींबा देत 'कर नाही त्याला डर कसली ?' असे म्हणत काही जण अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बोलणाऱ्या विचारवंतांना सोशल मिडीयावरच प्रतिप्रश्न करत आहेत. त्यामुळे सरकारच्या या नव्या निर्णयावरून सोशल मिडीयावर सध्या एक नवा कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळत आहे.




दरम्यान काही पत्रकारांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले असून सरकारवर टीका करणाऱ्या विचारवंतांच उलट प्रश्न विचारले आहेत.




 
 
Powered By Sangraha 9.0