शॉर्ट अॅण्ड क्रिस्प : एप्रिल फूल

03 Apr 2018 17:28:04

 
 
लहानपणापासून आतापर्यंत आपण अनेकदा अनेकांकडून एप्रिलफूल झालो असू. त्याची एक मजाच वेगळी असते. लहान असताना छोट्या मोठ्या गोष्टींवरून आपण एप्रिलफूल केलेलं आहे लोकांना. ही कहाणी पण अशाच एका एप्रिल फूलची कहाणी आहे.
 
मध्यमवर्गीय साधारण कुटुंब. आई, वडील आणि लेक. बाबा ऑफिस वरून आलेले असतात मजा मस्ती गप्पा असं छान सुरु असतं. वडील थकले भागलेले असतानाही आपल्या लेकीसोबत अगदी लहान मुलासारखे होवून खेळतात. आपल्या घरांमधीलच कथा आहे का काय असे एका क्षणी वाटायला लागले.
 
बाबा आपल्या ऑफिसमधील गंमत जम्मत सांगत असतात. लोकलमधून थकून भागून आल्यानं त्यांच्या शर्टाचं बटण तुटलेलं असतं. आई विचारते हे कसं तुटलं. तर ते सांगतात "आज लोकलला खूप गर्दी होती, खूप लोकं अचानक एकाच पुलावर आली आणि कुणीतरी ओरडलं.. पुल पडतोय म्हणून..." आणि पुढे?.. पुढे काय होतं हे जाणून घेण्यासाठी नक्कीच बघा हा लघुपट.
 
 
 
 
 
खरंतर या लघुपटात खूप काही वेगळं असं नाहीये. मात्र कधी कधी साध्यासुध्या गोष्टीच मनाला खूप भिडतात. त्यामुळे हा लघुपट एकदा नक्कीच बघा. या लघुपटात अमृता संत, सुधीश सिन्हा आणि रूही खान यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. जिगर फर्नांडिस दिग्दर्शित या लघुपटाला यूट्यूबवर ६२ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
 
- निहारिका पोळ  
Powered By Sangraha 9.0