शॉर्ट अॅण्ड क्रिस्प : Should Nirbhaya fight back ?

24 Apr 2018 16:05:35


 
काही दिवसांपासून लहान मुलींवर, महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांविषयी चर्चेला पुन्हा उधाण आलं. आजही लहान मुलींपासून ते वृद्ध महिलांपर्यंत कुणीही सुरक्षित नाही. निर्भयाची कथा आठवली की अंगावर अक्षरश: काटा येतो. आजचा लघुपट देखील याच विषयावर आहे. "बलात्काराहून मोठा गुन्हा दुसरा कुठलाही नाही, आणि हे दु:ख या यातना याहून भीषण दुसरे काहीच नाही" असे म्हणतात. मात्र अशा वेळी काय करावे? यावर भाष्य करणारा हा लघुपट.
एक मुलगी रात्री उशीर झाला असताना एका टॅक्सीतून घरी जायला निघते. आईला फोन करते की मोबाइलची बॅटरी कमी आहे. मी येतेच आहे घरी. थोड्यावेळाने तिच्या लक्षात येतं टॅक्सीवाला दुसऱ्या रस्त्याने नेतोय. ती त्याला प्रश्न विचारते, तो गर्दीचे कारण देवून शॉर्टकट ने नेत असल्याचे सांगतो. तिला भिती वाटायला लागते. ती त्याला मुख्य रस्त्यावर गाडी घ्यायला सांगते. तो ऐकत नाही, आणि यावरूनच तिला त्याचा हेतू लक्षात येतो. तो एका सूनसान ठिकाणी गाडी थांबवतो आणि तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो. आणि मग.....

 
 
 
 
पुढे काय होतं? तिच्यावर अतिप्रसंग ओढावतो? का ती त्याला चोख प्रत्यूत्तर देवून स्वत:ला वाचवते? स्वत:ची रक्षा करते? जाणून घेण्यासाठी हा लघुपट नक्की बघा. खरं तर या लघुपटातून आताच्या मुलींना खूप काही शिकायला मिळतं. प्रसंग ओढावल्यास त्याला कसं सामोरं जायचं. त्यासाठी काय तयारी असली पाहिजे. आजच्या काळात काय आवश्यक आहे? हे सर्वच या लघुपटातून सांगण्यात आलं आहे. खलील हेरेकर यांनी दिग्दर्शित केलल्या या लघुपटात शिवानी सुर्वे आणि संग्राम साळवी यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. या लघुपटाला यूट्यूबवर ६ लाखांहून अधिक व्ह्यूज आहेत. 

आजच्या काळात मुलींना महिलांना स्वत:चे रक्षण करायचे असेल, तर त्यांना स्वत:ला मनाने आणि शरीराने मजबूत करण्याची आवश्यकता आहे. त्या खंबीर राहिल्यात तर त्या कुठल्याही प्रसंगाला धैर्याने आणि शौर्याने तोंड देवू शकतील.

- निहारिका पोळ
Powered By Sangraha 9.0