शॉर्ट अॅण्ड क्रिस्प : वुमन एम्पावरमेंट

06 Mar 2018 13:14:06

 
८ मार्च दोन दिवसांवर येवून ठेपला आहे. त्यानिमित्त पुन्हा एकदा महिला सशक्तीकरण आणि सक्षमीकरणावर खूप काही बोलले जाईल, मात्र खरंच आपण हे कधी आचरणात आणणार? अशाच काहीशा विषयावर एका खूप वेगळ्या पद्धतीने भाष्य करणारा हा लघुपट आहे.
 
ही कथा आहे एका मुलीची आणि मुलाची. कदाचित पूर्व आयुष्यात ते एक मेकांवर प्रेम करत असतील, आणि अनेक वर्षांनी किंवा महीन्यांनी भेटले असावेत असा अंदाज बांधता येतो. मुलगा कराटे शिकण्यासाठी आला असतो. आणि अत्यंत तोऱ्यात येवून विचारतो, तू देखील शिकत होतीस ना असं काही सं. ती देखील थोडं शांतपणे उत्तर देते, हो तुला आठवतं.. मला बरं वाटतंय. तो देखील म्हणतो. या अशा सगळ्या गोष्टींसाठी सीएची नोकरी कोण सोडतं. त्यावर ती त्याला तिच्या पद्धतीने उत्तर देते. नेमकं काय करते ती?
 
 
जाणून घेण्यासाठी नक्की बघा हा लघुपट..
 
त्यानंतर काहीतरी असं होतं की त्या मुलाची मान खाली जाते. त्याला लक्षात येतं आपण चुकलोयं. का चुकलोय? कोण असते ती? आणि असं काय होतं की अतानक त्याचा तोरा नाहीसा होतो? यासाठी एकदा तरी हा लघुपट नक्कीच बघा..
लॉस्ट अॅण्ड फाउंडतर्फे प्रदर्शित या लघुपटाला यूट्यूवर ४ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
- निहारिका पोळ
Powered By Sangraha 9.0