मालाड मालवणीमध्ये झोपडपट्टीला भीषण आग

09 Dec 2018 17:43:38


 


मुंबई : मुंबईतील मालाडमधील मालवणी येथील झोपडपट्टीला आग लागली आहे. आगीची तीव्रता इतकी आहे की सर्वत्र धुराचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे परिसरावर धुराचे ढग तयार झाले आहेत. अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. दुपारी ३ वाजताच्या आसपास ही आग लागली असून आग कशामुळे लागली हे समजू शकले नाही. या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

 

रविवारी दुपारी ३च्या सुमारास ही आग लागली. झोपडपट्टीच्या मधल्या भागातून आगीचे लोळ वेगाने येत होते. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. या आगीचा फटका नेमक्या किती झोपड्यांना बसला याबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाही. आगीची तीव्रता पाहून आणखीही मदत मागविण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0