बस दरीत कोसळून ११ प्रवाशांचा मृत्यू

08 Dec 2018 13:00:07

 


 
 
 
पूंछ : जम्मू काश्मीमधील पूंछ येथे शनिवारी सकाळी एक प्रवासी बस दरीत कोसळली. या दुर्घटनेत बसमधील ११ प्रवाशांचा मृत्यू झाला असून १९ प्रवासी जखमी अवस्थेत आहेत. ही बस लोरानयेथून पूंछच्या दिशेने चालली होती.
 

मंदी प्लीरा येथील एका अवघड वळणावर बसच्या चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले. ही बस १०० फूट खोल दरीत कोसळली. पूंछ येथील घटनास्थळी मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. या बस अपघातातील जखमींची अवस्था गंभीर आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
Powered By Sangraha 9.0