ख्रिश्चियन मायकलचे भारतात प्रत्यार्पण

05 Dec 2018 16:27:40
 

नवी दिल्ली : ऑगस्टा-वेस्टलॅंण्ड हेलिकॉप्टर करारातील प्रमुख दलाल ख्रिश्चियन मायकलचे मंगळवारी रात्री दुबईहून प्रत्याप्रण करण्यात आले. मिशेलच्या एका खासगी विमानातून त्याला दुबईतून भारतात आणले. त्याच्यासह युएईच्या रक्षा मंत्रालयातील अधिकारीही आहेत.

 

सीबीआयकडून अजित डोभाल यांच्या नेतृत्वाखाली मिशेलचे भारतात प्रत्यार्पण केले गेले आहे. याविरोधात मिशेलने दुबईच्या एका न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, ती याचिका फेटाळण्यात आली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. ऑगस्टा-वेस्टलॅंण्डच्या करारात ५४ वर्षांच्या मिशेल यांचा तपास भारतीय यंत्रणा गेल्या काही काळापासून करत आहेत. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (युपीए) काळात हा करार झाला होता. तत्कालीन केंद्र सरकारने अशी १२ हेलिकॉप्टर खरेदी केली होती, त्याचा वापर पंतप्रधान, राष्ट्रपती आणि अन्य महत्वाच्या पदांवरील व्यक्तींसाठी केला जाणार होता. या करारामध्ये तीन दलालांपैकी एक ख्रिश्चियन माइकल आहेत.

 

ग्युडो हॅशके, कार्लो गेरोसा यांना यापूर्वीच अटक झाली होती. दुबईतील न्यायालयाने त्यांना अटकेचे आदेश दिल्यानंतर त्यांची रवानगी तुरुंगात केली आहे. मिशेल याला इंटरपोलच्या नोटीशीनंतर गेल्यावर्षी अटक झाली होती, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या देखरेखीखाली मिशेलचे प्रत्यार्पण करण्यात आले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
Powered By Sangraha 9.0