आरे वसाहतीतील आगीची चौकशी करा !

04 Dec 2018 15:13:57


मुंबई : गोरेगाव पूर्व आरे वसाहती नजीकच्या जंगला सोमवारी सायंकाळी आग लागली. ही घटना घडल्यावर आता चौकशीची मागणी केली जात आहे. वृक्ष सुक्या गवताने पेट घेतला चार किलोमीटरच्या परिसरात आगीचा भडका पसरला होता. दरम्यान आग लागली कि लावली, असा प्रश्न आता विचारण्यात येत आहे. या प्रकरणी वनखात्याने चौकशी करावी, अशी मागणी राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केली.

आगीसंदर्भात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचेही कदम यांनी सांगितले. मुंबई शहरे आणि उपनगरात सातत्याने आगीच्या घटना घडत आहेत, सोमवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान, सोमवार आरे वसाहतीमधील जंगलाला आग लागली. मुंबई अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवली.

 

तब्बत सहा तासांनंतर अग्निशामक दलाच्या जवानांना या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. दिंडोशीतील न्यू म्हाडा कॉलनीच्या मागील बाजूस व संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या डोंगराला आग लावण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. दरवर्षी डोंगराला आग लावत डोंगर व हिरवळ, झाडे व झुडपे नष्ट केली जात असल्याचा आरोपही केला जात आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
Powered By Sangraha 9.0