महाबळेश्वरसह महाराष्ट्रात गुलाबी थंडीची लाट

03 Dec 2018 18:29:42



सातारा : महाबळेश्वर म्हणजे महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून प्रसिद्ध आहे. अशामध्ये महाबळेश्वरमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. सोमवारी पहाटे महाबळेश्वरचा पारा ९ अंशाखाली आला होता.विशेष म्हणजे हिवाळा सुरु झाल्यानंतर पहिल्यांदाच तापमानात एवढी घाट झाली. थंडीचा भडका वाढल्यामुळे या मिनी काश्मीरमध्ये पर्यटनकांची गर्दी वाढू लागली आहे.

 

सोमवारी महाबळेश्वरातल्या वेण्णा लेक, लिंग मळा परिसरात पर्यटक गुलाबी थंडाचा आनंद लुटताना दिसून आले. तर दिवस कलंडताच महाबळेश्वमध्ये अनेक ठिकाणी शेकोट्या पेटायला सुरूवात झाली आहे. महाबळेश्वराशिवाय परभणी आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये पारा १० अंशाच्या आसपास गेला आहे. तसेच गेल्या दोन दिवसांपासून मुंबई आणि मुंबईत्या बहुतांश उपनगरांमध्ये पहाटेचा गारवा चांगलाच वाढला आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0