'या'मुळे पंचतारांकित हॉटेल्स, पब मालकांचे धाबे दणाणले

27 Dec 2018 19:27:09


 


मुंबई : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज असलेल्या देशभरातील अनेक पंचतारांकित हॉटेल्स आणि पब्स मालकांना मुंबई उच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. "गाण्यांच्या कॉपीराईटसशिवाय चित्रपटातील तसेच अल्बममधील गाणी पंचतारांकित हॉटेल्स आणि पब्समध्ये मालकांना वाजवता येणार नाही." असे आदेश न्यायालयाच्या न्यायमूर्ती भरती डांगरे यांनी दिले आहेत.

 

कॉपीराईटस कायद्याअंतर्गत हॉटेल पब्स आणि रेस्टॉरंटसारख्या आस्थापनांना मंडळांकडून कॉपीराईटस गाण्यांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. परंतु तशी परवानगी न घेता सर्रास या गाण्यांचा वापर केला जातो. त्यामुळे कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करत फोनोग्राफिक परफॉर्मन्स लिमिटेड(पी.पी.एल)च्यावतीने हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. संगीत परवाना देणाऱ्या पीपीएल मंडळाकडे २० लाखांहून अधिक गाण्यांचे मालकी हक्क आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0