खुशखबर ; ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री विशेष लोकल

26 Dec 2018 20:06:23



मुंबई : पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वे प्रशासनाने खुशखबर दिली आहे. ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे जोरदार स्वागत करणाऱ्या मुंबईकरांसाठी विशेष लोकल सोडण्यात येणार आहेत. यामुळे प. रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

 

नववर्षाच्या सेलिब्रेशननंतर घरी परतणाऱ्या मुंबईकरांसाठी पश्चिम रेल्वेवर मध्यरात्रीच्या सुमारास या विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. चर्चगेट ते विरारदरम्यान चार, तर विरार ते चर्चगेट अशा चार विशेष लोकल सोडण्यात येणार आहेत. या लोकल बारा डब्यांच्या असतील. याशिवाय सर्व स्थानकांवर त्यांना थांबा देण्यात येईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे. चर्चगेटवरून मध्यरात्री १. १५ वाजता, २.००, २.३० आणि ३.२५ वाजता, तर विरारहून मध्यरात्री १२.१५, १२.४५, १.४० आणि ३.०५ वाजता लोकल सुटेल.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0