मालमत्ता करातील वाढ कमी करा

24 Dec 2018 13:19:07

तळोद्यात शिवसेनेतर्फे पालिका मुख्याधिकार्‍यांना निवेदन

 
 
तळोदा :
 
शहरातील पालिका क्षेत्रात येणार्‍या मालमत्तावरील कर आकारणीत 24 टक्के वाढ करण्यात आली असून, ही वाढ अन्यायकारक व बेकायदेशीर असल्याने ती कमी करण्यात यावी अशी मागणी तळोदा पालिका मुख्याधिकार्‍यांकडे शिवसेना शहरप्रमुख जितेंद्र दुबे यांनी निवेदनाव्दारे केली आहे.
 
निवेदनात म्हटले आहे की, तळोदा शहरातील पालिका क्षेत्रात येणार्‍या घरांना दर चार वर्षांत पूर्वमूल्यांकन (घरपट्टी वाढ) च्या नावावर मागीलपेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात घरपट्टीची वाढ करण्यात आली आहे.
 
संबंधित घर तसेच असताना देखील घरपट्टी का वाढवून दिली जात आहे असा प्रश्न शहरवासीयांना पडला आहे. शासनाकडून कोणत्याही प्रकारचा सर्व्हे न करता घरपट्टी वाढवून दिली जात आहे.
 
घरपट्टी वाढविल्यानंतर पालिकेकडून हरकती मागविल्या जातात. त्यानंतर अर्ज भरा, असे फर्मान सोडले जाते. अर्जाची मुदत काही दिवसांवर ठेवून ज्यांनी अर्ज भरला अशांना नोटीस पाठवून बोलविले जाते.
 
ज्यांनी वेळेत अर्ज भरला त्यांचा फायदा होतो. मात्र ज्यांनी अर्ज किंवा घरपट्टी भरली नाही त्यांचे काय? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. वाढीव घरपट्टी माफ करावी,अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आला आहे.
 
 
निवेदनावर नगरसेविका प्रतीक्षा दुबे, शहर प्रमुख जितेंद्र दुबे, तालुका प्रमुख प्रकाश कुलकर्णी, उपतालुकाप्रमुख काशिनाथ कोळी, इमरान शेख, युवा सेना शहरप्रमुख जगदीश चौधरी, विनोद वंजारी, विजय मराठी, किशोर कुंभार, जय सूर्यवंशी आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.
Powered By Sangraha 9.0