करंजी बुद्रूक येथे विद्यार्थ्याचा लैंगिक छळ

22 Dec 2018 14:08:21

संस्थेच्या संचालकासह चार जणांविरुद्ध गुन्हा


 
 
नवापूर : 
 
तालुक्यातील एका शाळेच्या वसतिगृहामध्ये राहणार्‍या 11 वर्षीय विद्यार्थ्याचा लैंगिक छळ करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. शिक्षकाच्या फिर्यादीनंतर हे प्रकरण उघडकीस आले. याप्रकरणी संस्थेच्या संचालकासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.
 
 
तालुक्यातील करंजी बुद्रूक येथे फिलाडेल्फिया मिशन स्कूल आहे. या शाळेत पहिली ते दहावीचे वर्ग आहेत. या परिसरात विद्यार्थ्यांचे वसतिगृह झाले आहे. या वसतिगृहामध्ये राहणार्‍या 11 वर्षीय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची तक्रार शाळेतील प्रशिक्षक राकेश आवळे (40) यांनी गुरुवार रात्री उशिरा नवापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
 
 
या तक्रारीनंतर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी फिलाडेल्फिया मिशन स्कूलचे संचालक जोष्वा पुन्नुस, व्यवस्थापक प्रेझी पुन्नुस, सोनू आणि स्टॅलिन या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 
नवापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय राजपूत यांनी तातडीने भेट देऊन जाबजबाब घेणे सुरू केले. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक डी. डी. पाटील करीत आहेत.
 
 
शुक्रवारपर्यंत याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणातील विद्यार्थ्यांच्या पालकांनी अजून फिर्याद दाखल केली नाही.
Powered By Sangraha 9.0