३१ डिसेंबर पूर्वी बदला तुमचे मॅगस्ट्राइप क्रेडिट/डेबिट कार्ड

22 Dec 2018 13:35:40

 

 
 
 
मुंबई : तुम्ही जर मॅग्नेटिक स्ट्राईप असलेले डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरत असाल तर ते तातडीने बदलून घ्यावे लागणार आहे. जुनी मॅगस्ट्राइप डेबिट आणि क्रेडिट कार्ड ३१ डिसेंबर रोजी बंद होणार आहेत. त्यामुळे त्यापूर्वी बँक ग्राहकांनी ही कार्ड बदलून घ्यावीत, असे आदेश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत.
 

जुनी डेबिट आणि क्रेडिट कार्ड बदलण्याची प्रक्रिया ३१ डिसेंबर पर्यंत सर्व बँक ग्राहकांना पूर्ण करावी लागणार आहे. ३१ डिसेंबर नंतर मॅग्नेटिक स्ट्राइप असलेली सर्व डेबिट आणि क्रेडिट कार्ड ब्लॉक करण्यात येणार आहेत. २७ ऑगस्ट २०१५ रोजी रिझर्व्ह बँकेकडून यासंदर्भात परिपत्रक जारी करण्यात आले होते.

 

सर्व बँकांनी आपल्या ग्राहकांना मॅग्नेटिक स्ट्राइप असलेले डेबिट आणि क्रेडिट कार्ड बदलून द्यावे. त्याऐवजी बँक ग्राहकांना युरोपे म्हणजेच ईएमव्ही (EMV), मास्टर कार्ड आणि व्हिसा बेस्ड कार्ड द्यावे. अशा सूचना रिझर्व्ह बँकेकडून देण्यात आल्या होत्या. तुम्ही जर अजूनही ईएमव्ही बेस्ड कार्डासाठी अर्ज केला नसेल तर ३१ डिसेंबरपूर्वीच हे काम करून घ्या. ३१ डिसेंबरपूर्वी बँक ग्राहकांनी कार्ड बदलून घेतले नाही, तर त्यांना एटीएम व्यवहार करता येणार नाही. ईएमव्ही बेस्ड कार्डासाठी बँक ग्राहकांना कोणत्याही प्रकारचे शुल्क भरण्याची गरज भासणार नाही.

 

    माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/
 
Powered By Sangraha 9.0