कोरेगाव-भीमा प्रकरण : आनंद तेलतुंबडेंची याचिका फेटाळली

21 Dec 2018 14:35:36
 

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने कोरेगाव भीमा हिंसाचार नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाप्रकरणी आनंद तेलतुंबडे यांना मोठा धक्का दिला आहे. तेलतुंबडेंनी दाखल केलेली उच्च न्यायालयाची याचिका फेटाळली असून या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी त्यांना तीन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे.

 

दरम्यान, पुणे पोलिसांनी आनंद तेलतुंबडे यांच्यावर नक्षलवादी संघटनेशी संबंध असल्याप्रकरणी कारवाई केली मात्र 'मी कोणत्याही बेकायदा कार्यवाहीत सहभागी झालेलो नाही कोरेगाव-भीमा येथे झालेल्या हिंसाचाराशी माझा काहीही संबंध नाही', असा दावा करत आनंद तेलतुंबडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत त्यांच्यावर एफआयआर रद्द करण्याची मागणी केली होती.

 

मुंबई उच्च न्यायालयात आनंद तेलतुंबडे यांच्या याचिकेवर शुक्रवारी (२१ डिसेंबर) सुनावणी झाली होती. न्यायालयाने तेलतुंबडे यांची याचिका फेटाळून लावली. त्यांना सर्वोच्च न्यायालयात तीन आठवड्यात दाद मागण्याची मुदत देण्यात आली आहे. नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली प्रा. वरवरा राव, सुधा भारद्वाज, अरुण परेरा, वर्नन गोन्साल्विस आणि गौतम नवलखा यांना पुणे पोलिसांनी अटक केली होती.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
Powered By Sangraha 9.0