२०२२चे 'जी २०' शिखर परिषद भारतात होणार

02 Dec 2018 16:41:28



नवी दिल्ली : २०२२ साली होणाऱ्या जी २० शिखर परिषदेचे यजमानपद भारताकडे असेल अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. अर्जेंटीना येथील दोन दिवसीय समितीच्या समारोप सोहळ्यात पंतप्रधान मोदींनी ही घोषणा केली. विशेष म्हणजे २०२२ला भारताला स्वतंत्र होऊन ७५ वर्षे पूर्ण होतील.

 

पंतप्रधानांनी सांगितले की, “इटलीकडे विनंती केली की २०२१चे यजमानपद त्यांच्याकडे ठेवावे, म्हणजे भारताला २०२२चे यजमानपद मिळेल. त्यावर इटालीसह इतर देशांनीसुद्धा सहमती दर्शवली. जी-२०मध्ये जगातील महत्त्वाच्या २० आर्थिक देशांचा समावेश असतो. या परिषदेचे यजमानपद मिळणे मानाचे मानले जाते.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी युरोपच्या परिषदेचे अध्यक्ष डोनाल्ड टस्क, युरोप आयोगाचे अध्यक्ष जीन क्लॉड जंकर आणि जर्मन चान्सेलर एंजेला मार्केल यांची भेट घेतली. याचवेळी मोदींनी दहशतादाशी लढा देण्यासाठी सर्वच राष्ट्रांनी एकत्र येत प्रयत्न करण्यासोबतच भारत- युरोपातीस संबंध आणखी दृढ करण्याविषयी चर्चा केली.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0