अडीच हजार किलोच्या जीसॅट-७ संपर्क ग्रहाचे आज प्रक्षेपण

19 Dec 2018 11:46:54


चेन्नई : तामिळनाडूतील इस्रोच्या श्रीहरीकोट्टा अंतराळ प्रक्षेपण केंद्रातून बुधवारी 'जीसॅट-७ए' हा संपर्क उपग्रह प्रक्षेपित केला जाणार आहे. सुमारे अडीच हजार किलो वजनाचा हा उपग्रह भारताचे संचार क्षेत्रात महत्त्वाचे पाऊल ठरवणारा आहे. या उपग्रहाला जीएसएलव्ही एफ-११च्या माध्यमातून बुधवारी दुपारी २ वाजता प्रक्षेपित केले जाईल.

 

जीएसएलव्ही एफ-११ हा वाहक जीसॅट-७ए या उपग्रहाला 'जिओसिंक्रोनस ट्रांसफर ऑरबिट' (जीटीएसओ) म्हणजेच पृथ्वीच्या कक्षेत प्रस्थापित करणार आहे. त्यानंतर प्रणोदन पद्धतीच्या (प्रपल्शन सिस्टम) मदतीने काही दिवसांत तो सूनिश्चित स्थानावर पाठवला जाणार आहे, अशी माहीती इस्त्रोने दिली. जीएसएलव्ही एफ-११ हा फोर-जी उपग्रह वाहक आहे.

 
 

हे वाहक जीसॅट-७ए या उपग्रहाला ठराविक कक्षेत प्रस्थापित करण्यासाठी तीन टप्पे लागणार आहेत. यातील पहिल्या टप्प्यामध्ये पृथ्वीवर या वाहनाचे 'लिक्विड स्ट्रॅप' आणि रॉकेट मोटर सुरू होणार असून त्यानंतर त्याला वरच्या दिशेने पाठवण्यासाठी 'हाय थ्रस्ट इंजन' सुरु होईल. त्यासाठी तो लिक्विड इंधन म्हणजेच द्रवरुपातील इंधनाचा वापर करेल. तर, तिसऱ्या टप्प्यामध्ये अवकाशात उपग्रह प्रस्थापित केला जाईल.

 
 
 


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 

 
Powered By Sangraha 9.0