डॉ. काणे विद्यामंदिरात सांस्कृतिक कार्यक्रम

13 Dec 2018 11:15:20

 
 
नंदुरबार : 
 
येथील डॉ. काणे विद्यामंदिरात सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी एकूण 35 कार्यक्रम सादर होऊन आरोग्य, शिक्षण, पाणी वाचवा आदी समाजोपयोगी विषयांवर विशेष भर देण्यात आला.
 
कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन गिरीश खुंटे यांच्या हस्ते करण्यात आले तर दीपप्रज्वलन डॉ. सोनाली कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमात बालमंदिर, इंग्रजी माध्यम व काणे विद्यामंदिर या तिघा शाखेतील विद्यार्थिनींनी 35 कार्यक्रमांचे सादरीकरण केले.
 
 
कार्यक्रमास नरेंद्र सराफ, प्राची कुलकर्णी, प्रशांत पाठक, डॉ. सोनाली कुलकर्णी, श्रीराम मोडक, मिनल म्हसावदकर, सुलभा महिरे, सोनल वाघ आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन जी. वाय. बेडसे यांनी तर आभार वळवी यांनी मानले.
Powered By Sangraha 9.0