मुंबईत महाबळेश्वरची हवा !

11 Dec 2018 13:24:15
 

मुंबई : महाबळेश्वर आणि मुंबईचे किमान तापमान सोमवारी १६ अंश नोंदविण्यात आले. हिवाळ्यातील गारव्यात वाढ झाल्यामुळे पहाटेच्या वेळी मुंबईकरांना महाबळेश्वरचा अनुभव घेता येणार आहे. सोमवारी राज्यातील सर्वाधिक कमी किमान तापमान नाशिकमधील निफाड येथे ९.०६ अंश नोंदविण्यात आले.

 

मुंबईच्या किमान तापमानात दोन दिवसांपासून घट नोंदवण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात शनिवारी मुंबईचे किमान तापमान १८ अंश नोंदण्यात आले. रविवारी यात आणखी एका अंशाची घट झाली ते १७ अंशांवर घसरले. सोमवारी किमान तापमा आणखी एका अंशानी घसरले. मुंबईचे किमान तापमान १६ अंश नोंदविण्यात आले होते. महत्त्वाचे म्हणजे मुंबईच्या कमाल तापमानातही घट नोंदवण्यात येत आहे. रात्रीच्यावेळी सुरू असणाऱ्या गार वाऱ्यांमुळे गारवा आणखी वाढत आहे.

 


भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, २४ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे. मध्य महाराष्ट्रात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला, कोकण आणि मराठवाड्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
Powered By Sangraha 9.0