पंजाब नॅशनल बॅंकेवर सायबर हल्ला

11 Dec 2018 12:50:53
 
 

नवी दिल्ली : सराय रोहिल्ला या दिल्लीतील पंजाब नॅशनल बॅंकेच्या शाखेवर शनिवारी सायबर हल्ला झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. बॅंकेच्या शाखेतील सुमारे डझनभर खात्यांतून रक्कम वळती करण्यात आली. यावेळी खात्यातून एटीएमद्वारे पैसे काढल्याचा लघुसंदेश मोबाईलवर आला. मात्र, ग्राहकांनी कोणताही व्यवहार केला नव्हता.

 

शनिवारी सकाळी ते वाजताच्या दरम्यान हा प्रकार घडला. ऑक्टोबर रोजी दुसरा शनिवार असल्याने बॅंक बंद होती. सोमवारी बॅंक उघडल्यावर सर्व ग्राहकांनी बॅंकेच्या शाखेत एकच गर्दी केली. ग्राहकांनी या प्रकरणी पोलीसांत तक्रार केली आहे. दरम्यान नव्याने चिप असलेल्या एटीएम कार्ड असलेल्या खात्यातील रक्कमही यातून वळती करण्यात आली. या प्रकरणी सायबर सेल तपास करत आहे.

 

दिल्लीतील अन्य काही पीएनबीच्या शाखांमध्येही असा प्रकार घडला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बॅंक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये क्लोनिंग झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बॅंकेने खातेधारकांच्या रक्कमेबद्दल विमा पॉलीसी मंडळाकडे दावा केला आहे. ही घटना घडल्यानंतर अनेकांनी आपली एटीएम कार्ड ब्लॉक केली आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
Powered By Sangraha 9.0