आजपासून बदलणार 'या' गोष्टी...

01 Dec 2018 13:55:58



डिसेंबर महिन्याचा आजचा पहिला दिवस. २०१८ च्या अखेरच्या महिन्यात पहिल्याच दिवसापासून अनेक शासकीय बदल होणार आहेत. या बदलांचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बदलांची माहिती करून घेणे आवश्यक आहे. नेमके कोणते बदल झालेत त्यावर एक नजर...

 

ड्रोन होणार कायदेशीर

 

नागरी हवाई मंत्रालयाच्या नवीन धोरणानुसार आजपासून देशात ड्रोनच्या वापरास कायदेशीर परवानगी मिळणार आहे. मात्र, त्यासाठी ड्रोनच्या मालकांना नोंदणी करून डिजिटल परमिट घ्यावे लागणार आहे.

 

वडिलांचे नाव नाही आवश्यक

 

नवीन पॅनकार्डला अर्ज करत असाल तर लक्षात असू द्या की, जर तुमचे आई-वडील कायदेशीररित्या वेगळे झाले असतील तर अर्जदाराला आजपासून वडिलांचे नाव देणे बंधनकारक असणार नाही.

 

SBI ची नेटबँकिंग सेवा बंद होणार?

 

ज्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांनी ३० नोव्हेंबरपर्यंत आपला मोबाईल क्रमांक रजिस्टर केला आहे, त्याच ग्राहकांना नेटबँकिंग सेवेचा लाभ घेता येणार आहे. ज्यांनी आपला मोबाईल क्रमांक रजिस्टर केला नाही त्यांना आजपासून SBI च्या नेटबँकिंग सुविधेचा लाभ घेता येणार नाही.

 

तर पेंशन होणार बंद..

 

पेन्शनरांना दर वर्षी नोव्हेंबर महिन्यात लाइफ सर्टिफिकेट बँकेत जमा करणे आवश्यक असते. पेन्शनदारांनी हे प्रमाणपत्र ३० नोव्हेंबरपर्यंत सादर न केल्यास पेन्शन थांबण्याची शक्यता आहे.

 

एसबीआय बडी आजपासून बंद

 

स्टेट बँक ऑफ इंडियाची 'एसबीआय बडी' हे अॅप आजपासून बंद होणार असून त्याऐवजी योनो' (YoNo) या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नवीन अॅपचा उपयोग करावा लागणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0