बापरे! भारतात आला पाच कॅमेरे असलेला फोन

22 Nov 2018 15:24:11



मुंबई : सॅमसंगचा Galaxy A9 हा फोन भारतात दाखल झाला आहे. या फोनची खासियत म्हणजे या फोनमध्ये चक्क पाच कॅमेरे असणार आहेत. या फोनच्या मागील बाजूस चार तर एक सेल्फी कॅमेरा असणार आहे. भारतात बुधवारी (२१ नोव्हेंबर) Galaxy A9 हा फोन सादर करण्यात आला. पाच कॅमेरा असणारा हा जगातील पहिला फोन ठरला आहे. भारतीय बाजारात या फोनची किंमत ३६,९९० रुपये एवढी ठेवण्यात आली आहे.

सॅमसंगच्या या नवीन फोनमध्ये भारतीय ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक नव-नवीन फिचर देण्यात आले आहेत. मात्र या फोनच मुख्य आकर्षण फोनमध्ये असलेले पाच कॅमेरेच आहेत. या फोनच्या पाचही कॅमेरामध्ये इंटिलेजीयंट कॅमेरा हे नवीन फिचर देण्यात आले आहे. यामुळे अतिशय उच्च दर्जाचे फोटो काढता येणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

 

या फोनमधील मुख्य कॅमेरा २४ मेगापिक्सल्स क्षमतेचा असून यामध्ये एलईडी फ्लॅश आणि एफ/१.७ अपर्चरचा समावेश आहे. तर दुसरा कॅमेरा १०, तिसरा ८ व डेप्थ सेन्स कॅमेरा हा ५ मेगापिक्सल क्षमतेचा आहे. या शिवाय कंपनीने २४ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देखील दिला आहे. दरम्यान, ६ व ८ जीबी रॅम असलेले दोन मॉडेल बाजार आणले असून याची किंमत अनुक्रमे ३६,९९० आणि ३९,९९० रूपये एवढी ठेवण्यात आली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0