तामिळनाडूला 'गज'चा तडाखा; सहा जणांचा मृत्यू

16 Nov 2018 14:33:30


 

चेन्नई : तामिळनाडू व आंध्रप्रदेशच्या किनारी गज चक्रीवादळाने हैमान घातले आहे. यात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला असून मोठी वित्तहानी झाल्याची माहिती समोर आली आहे. या चक्रीवादळामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून तामिळनाडू सरकारने जवळपास ७६ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.
 

ताशी ८० ते ९० किलोमीटरच्या वेगाने वाहणारे वारे पहाटे तीनच्या सुमारास तमिळनाडूमधील नागपट्टणमजवळ किनाऱ्यावर येऊन पोहचले. यामुळे अनेक भागात पडझड पडझड झाली असून यात सहा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, पुढील २४ तासात या चक्रीवादळाची तीव्रता वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाच्या पट्टयामुळे हे चक्रीवादळ निर्माण आहे. या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर देखील परिणाम होण्याची शक्यता पुणे हवामान विभागाने वर्तवली आहे. पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ वातावरणाची शक्यता असून मराठवाड्यातील अनेक भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0