नीरव मोदी 'या' बँकांचे कर्ज फेडण्यास तयार?

14 Nov 2018 13:28:39


 


एचएसबीसी व आयडीबी या विदेशी बँकांची कर्ज फेडण्याची मोदीची तयारी


नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याचा मुख्य आरोपी नीरव मोदी विदेशी बँकांचे कर्ज फेडण्यास तयार झाला आहे. न्यूयॉर्कमधील एचएसबीसी आणि इस्रायल डिस्काऊंट बँक (आयडीबी) या दोन बँकांची कर्ज नीरव मोदी फेडणार असल्याची चर्चा आहे. याबाबतचे वृत्त एका दैनिकाने याबाबतची बातमी छापली आहे. १३ हजार कोटी रुपयांचा घोटाळा करून भारताबाहेर पळालेल्या निरव मोदीच्या या भूमिकेवर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

 

या दैनिकाच्या बातमीनुसार, निरव मोदीने एचएसबीसी बँकेतून २००८ साली १ कोटी ६० लाख डॉलरचे कर्ज घेतले होते. तर इस्रायल डिस्काऊंट बँकेतून २०१३ साली १ लाख २० कोटी डॉलरचे कर्ज घेतले होते. १३ हजार कोटींच्या घोटाळ्यात या बँकांचाही समावेश होता. त्यामुळे हे थकीत कर्ज अखेर न्यायालायत पोहचले होते. त्यानुसार न्यायालयाने कर्ज वसुलीची या बँकांना परवानगी दिली होती.

 

न्यायालयाच्या परवानगीनुसार बँकांचे कर्ज फेडण्याची निरव मोदीने तयारी दर्शवली होती. त्यानुसार या बँकांनी कर्ज वसूल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान, मोदीकडून थकीत रक्कम वसूल करण्यात भारतीय यंत्रणांना अपयश आले असले तरी विदेशी बँकांना मात्र यश आल्याने चर्चांना उधाण आले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0