आता महाबळेश्वरची 'घोडेस्वारी' बंद

31 Oct 2018 16:50:04


 


सातारा: ऐन दिवाळीत जर तुम्ही महाबळेश्वर ला फिरायला जाणार असाल तर एक वाईट बातमी आहे. महाबळेश्वर आणि पाचगणी फिरायला जाणाऱ्या पर्यटकांना आता घोड्यावर बसून सैर करण्याचा आनंद घेता येणार नाही. कारण येथील स्थानिक पोलिसांनी घोडेस्वारीवर आता बंदी आणली आहे. यामुळे पर्यटकांना घोड्यावर बसून सैर करता येणार नाही तसेच फोटोही काढता येणार नाही.

 

पोलीस प्रशासनाने बंदी घातल्याने पिढीजात घोड्यांच्या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या लोकांना मात्र खूप मोठा तोटा सहन करावा लागणार आहे. मुख्यत्वाने पाचगणीचा टेबल लँड आणि महाबळेश्वरच्या वेण्णालेक परिसरात घोडेस्वारीचा व्यवसाय चालतो. परंतु बंदीनंतर या महत्वाच्या पॉईंट्सवरती शुकशुकाट पाहायला मिळत आहे. अचानक आणलेल्या या बंदीमुळे पर्यटकांमध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळत आहे.

 

काही दिवसांपूर्वी पाचगणीच्या टेबल लँडवर घोडेस्वारी करताना पर्यटकांचा घोड्यावरून पडून मृत्यू झाला होता. यामुळे पोलीस प्रशासनाने घोड्यांवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेतल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. घोडे व्यवसायिंकावर आलेल्या या बंदीमुळे मात्र स्थानिक नेते आक्रमक झाले आहेत. महाबळेश्वर हे पर्यटन स्थळ आहे. एका घटनेने घेतलेली हि भूमिका चुकीचे असल्याचे मत महाबळेश्वरचे नगराध्यक्ष कुमार शिंदे यांनी व्यक्त केले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0