बाजारात पुरेशा प्रमाणात रोकड रिझर्व्ह बॅंकेची ग्वाही

31 Oct 2018 18:01:18
 

नवी दिल्ली : बिगरबॅंकिंग वित्त संस्थांना (एनबीएफसी) भेडसावणाऱ्या रोकड टंचाईबाबत रिझर्व्ह बॅंकेने अर्थ खात्याला माहिती दिली आहे. बिगर बॅंकींग क्षेत्रातील रोकडटंचाईबाबत सद्यस्थितीतील चित्राविषयी स्पष्टीकरण देण्यात आले. सध्या जी परिस्थिती दाखवली जात आहे, त्यापेक्षा परिस्थिती नियंत्रणात असल्याचे आरबीआयने म्हटले आहे.

 

बाजारातील चलन उपलब्धतेचे प्रमाण राखण्यासाठी खबरदारी घेतली जाईल, अशी ग्वाही रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर डॉ. ऊर्जित पटेल यांनी दिली. "आयएल ऍण्ड एफएस' आर्थिक संकटात गेल्यावर बाजारातील रोकड टंचाईवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. अनेक बिगरबॅंकींग कंपन्यांना आर्थिक चणचण जाणवू लागल्याने किरकोळ कर्जवाटपावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे रोकड तरलता वाढवण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने उपाययोजना हाती घेतल्याचे सांगितले आहे. नोव्हेंबर महिन्यात रिझर्व्ह बॅंकेकडून ४० हजार कोटींची अतिरिक्‍त रोकड उपलब्ध केली जाणार आहे. अर्थव्यवस्थेत सरसकट रोकड टंचाई नाही. मात्र काही क्षेत्रांमध्ये रोकड कमी असल्याचे रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
Powered By Sangraha 9.0