गोवा भाजपचे संकेतस्थळ ‘हॅक’

15 Oct 2018 15:26:56
 

गोवा : भारतीय जनता पक्षाचे गोवा राज्यातील संकेतस्थळ हॅककरण्यात आले आहे. हॅक करणाऱ्यांनी पाकीस्तान जिंदाबाद या आशयाचा मजकूर वेबसाईटवर लिहीला आहे. सोमवारी दि. १५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला.

 

भारतीय जनता पक्षाचे गोवा राज्याचे अधिकृत संकेतस्थळ http://www.goabjp.org हे आहे. हॅक करणाऱ्यांनी पाकिस्तान जिंदाबाद या संदेशासह catch.if.you.can@Hotmail.com हा मेल आयडी दिला आहे. हॅक करणाऱ्याने मोहम्मद बिलाल आणि टीम पीसीई, असे नावही त्यात लिहिले होते. दरम्यान गोवा भाजप वेबसाईट पूर्ववत करण्याचे काम सुरू झाले असून वेबसाईट अंडरमेंटेनन्स असा संदेश सध्या झळकत आहे.

 
गोवा भाजपची वेबसाईट नेमकी कोणी हॅक केली त्याची माहिती अद्याप लागलेली नाही. भाजपकडूनही याप्रकरणी अद्याप कोणतिही प्रतिक्रीया देण्यात आलेली नाही. पाकीस्तानातील काही सायबर हल्लेखोर या मागे असू शकतात, असा अंदाज सध्या व्यक्त केला जात आहे. या पूर्वी भारतीय जनता पक्षाचे जम्मू काश्मीर राज्याचे संकेतस्थळ पाकीस्तानातून हॅक झाले होते.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
Powered By Sangraha 9.0