सप्टेंबरमध्ये जीएसटीतून ९४ हजार ४४२ कोटी महसूल

01 Oct 2018 15:25:30
 


नवी दिल्ली : सप्टेंबरमध्ये जीएसटी करसंकलनात वाढ झाली असून एकूण ९४ हजार ४४२ कोटींचा महसूल जमा झाल्याची आकडेवारी केंद्रीय अर्थमंत्रालयाने जाहिर केली आहे. गेल्या महिन्यात हा आकडा ९३ हजार ६९० कोटींवर पोहोचला होता. अर्थमंत्रालयाने सोमवारी हे आकडे जाहिर केले असून सप्टेंबर महिन्यात ६७ लाख फाईल रिटर्न केल्याचेही त्यात म्हटले आहे. अर्थमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ९४ हजार ४४२ कोटी रुपयांच्या महसूलात सीजीएसटीतून १५ हजार ३१८ कोटी तर एसजीएसटीतून २१ हजार ६१ कोटी रुपये जमा झाले आहेत. इंटिग्रेटेड जीएसटीतून ५० हजार ७० कोटी महसूल जमा झाला आहे. केंद्रीय अर्थमंत्रालाच्या माहितीनुसार, केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वाटाघाटीतून सप्टेंबरमध्ये ३० हजार ५७४ कोटी आणि ३५ हजार १५ कोटींचा महसुल जमा झाला आहे. 

 
 
 
   माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ 
 
Powered By Sangraha 9.0