...म्हणून पुस्तकांचं गाव भिलार राहणार राहणार बंद

24 Jan 2018 19:10:11

 
सातारा : पुस्तकांचं गाव म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या भिलार येथे गावची जत्रा असल्याने, दिनांक २५ ते २७ जानेवारी या कालावधीत पुस्तकांचं गाव प्रकल्प तात्पुरता बंद राहणार आहे, अशी माहिती राज्य मराठी विकास संस्थेच्या संचालकांनी आज दिली आहे.
 
या काळात भिलार गावात अनेक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत. मूळ गाव भिलार असलेले देशभरातील भिलारवासीय जत्रेच्या निमित्ताने गावास भेट देणार आहेत. त्यामुळे गावातील घरे (वाचनालये) पर्यटकांना आणि शालेय व महाविद्यालयीन सहलींना वाचनाची व पर्यटनाची सेवा देऊ शकणार नाहीत. या पार्श्वभूमीवर पर्यटकांनी सहकार्य करावे, अशी विनंती ग्रामपंचायत भिलार व प्रकल्प कार्यालय, पुस्तकांचं गाव यांनी केली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0