अशोककुमार चौधरी डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्काराने सन्मानित

26 May 2017 20:42:37



भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्काराने नंदुरबार येथील सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक अशोककुमार वसंतलाल चौधरी यांचा कोल्हापूर येथे झालेल्या कार्यक्रमात मंत्र्यांच्याहस्ते अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला. हा पुरस्कार राज्य शासनाकडून देण्यात आला आहे.


कोल्हापूर येथील केशवराव भोसले नाट्यगृहात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्काराचे वितरण करण्यात आले.यावेळी कोल्पापूरचे पालकमंत्री व महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर हसीना फरास, जि.प.अध्यक्षा सौमिका महाडिक यांच्यहस्ते अशोककुमार चौधरी यांचा सपत्नीक २५ हजार रुपये रोख, स्मृती चिन्ह देवून गौरव करण्यात आला.


डॉ.बाबासहेबांच्या १२५ व्या जयंती निमित्त असलेल्या या सोहळ्यात राज्यातील १२५ समाजसेवकांना गौरविण्यात आले.पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वच स्तरातुन अभिनंदन होत आहे.

Powered By Sangraha 9.0