मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातून वाहणाऱ्या कयाधू नदीचे पुनरुज्जीवन करण्यात यावे, या करिता लोकांकडून प्रयत्न केले जात आहेत. मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने जलयुक्त शिवार योजना काम करत आहे. परंतु हिंगोली जिल्ह्यातून वाहणाऱ्या कयाधू नदीचे पुनरुज्जीवन करण्यात यावे यासाठी उगम या स्वयंसेवी संस्थेतर्फे प्रयत्न केले जात आहेत.
कयाधू नदीचे पुनरुज्जीवन केले जावे, याकरिता उगम या संस्थेने ‘शिवारातील पाणी शिवारात आणि गावातील माणूस गावात’ असे म्हणत कयाधू नदीच्या पात्रात फेरी काढत कयाधू नदीच्या पुरुज्जीवनाचे प्रयत्न सुरु केले आहेत. स्थानिकांकडून उगम संस्थेच्या या प्रयत्नास चांगली साथ लाभली आहे.