पालकमंत्र्यांच्या हस्ते कथा परिवर्तनाची पुस्तिकाचे विमोचन

    26-Dec-2017
Total Views |
 
 
 
 
 
 
गोंदिया: राज्य सरकारच्या कार्यकाळाला नुकतेच तीन वर्षे पूर्ण झाले आहे. राज्य सरकारने जनतेच्या कल्याणासाठी तीन वर्षात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने सरकारच्या कामगीरीची माहिती देणाऱ्या ‘कथा परिवर्तनाची’ ही पुस्तिका तयार केली आहे. पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी २४ डिसेंबर रोजी गोंदिया येथील बसस्थानकात आयोजित गोंदिया-नागपूर या शिवशाही वातानुकूलीत बससेवेच्या शुभारंभ प्रसंगीया पुस्तिकेचे विमोचन केले.
 
कथा परिवर्तनाची या पुस्तिकेमध्ये शेती आणि शेतकऱ्यांसाठी शेतीतील गुंतवणूक, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, तूर खरेदी, सोयाबीनला अनुदान, शेतकऱ्यांची सामाजिक सुरक्षा, २०६५ हवामान केंद्रे, गटशेती, सातबारा ऑनलाईन, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प, भ्रष्टाचार संपविण्यासाठी थेट लाभ हस्तांतरण, कृषि प्रक्रिया उद्योगाची निर्मिती, शेती सलग्न उद्योग, पाणी आणि सिंचन, स्वच्छ भारत अभियान, कायदयाचे सरकार, ग्रामोदयाचे सरकार, सुप्रशासन/डिजीटल महाराष्ट्र, मेक इन महाराष्ट्र, पारदर्शीता आणि शाश्वतता, २०२२ पर्यंत सर्वांना घरे, सामाजिक न्याय विभागाच्या योजना, आदिवासी विकास विभागाच्या योजना, शिक्षण व रोजगार, वैद्यकीय शिक्षण, कौशल्य विकास, आरोग्य, प्रकाशमान महाराष्ट्र, पायाभूत सुविधा, रस्ते विकास, स्मार्ट सिटी, अमृत अभियान, महिला व बालकल्याण योजना, पर्यटनाला चालना व ग्राहक हिताचे सरकार, संगणकीकरण व पेपरलेस कार्यालय याबाबतची माहिती देण्यात आली आहे.